कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी हिंसाचाराचे बोट लागले. तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत माकपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला; तर चार जण जखमी झाले. एकूण ६२ मतदारसंघांमध्ये सरासरी ७९. २२ टक्क्यांहून अधिक मतदानाची टक्केवारी नोंदली गेली. मतदानाच्या अंतिम टक्केवारीत आणखी किरकोळ वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. दरम्यान, जोरासांको मतदारसंघात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे त्यांच्या कुटुंबीयांसह मतदान करण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के मतदान
पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी हिंसाचाराचे बोट लागले. तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत माकपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला; तर चार जण जखमी झाले.
Maharashtra Times 22 Apr 2016, 3:45 am