अ‍ॅपशहर

मायावतींच्या आरोपात तथ्य नाही: निवडणूक आयोग

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागलेल्या बसप नेत्या मायावती यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला. मात्र मायावती यांच्या या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. बसप अध्यक्षा मायावती यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही असे आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे.

Maharashtra Times 11 Mar 2017, 9:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election commission reply to mayawati no merit in allegations of evm tampering
मायावतींच्या आरोपात तथ्य नाही: निवडणूक आयोग


उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागलेल्या बसप नेत्या मायावती यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप केल्यानंतर मायावती यांच्या या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. मायावती यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही असे आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे.

मायावती यांनी पत्राद्वारे केलेली मागणी कायदेशीरदृष्ट्या देखील तर्कसंगत नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरून ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आला आहे असा थेट आरोप मायावती यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला आहे. याच कारणामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून जुन्या पद्धतीनुसार मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी मायावतींनी या पत्रातून केली आहे. विशेषत: मुस्लीम बहुल भागात भाजपने मिळवलेल्या यशावर मायावतींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, मायावती असे निराशेपोटी म्हणत असल्याचे भाजपने म्हटले आहे. आपण मायावतींची मनस्थिती समजू शकतो अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज