अ‍ॅपशहर

ईपीएफओच्या ऑफिसमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

दिल्लीत द्वारकामधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थे (EPFO)च्या ऑनलाइन ऑफिसमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. ईपीएफओच्या अकाउंटमधून कोट्यवधी रुपये काढण्यात आलेत. ४ कोटी रुपये काढल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

मनीष अग्रवाल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2018, 3:09 pm
नवी दिल्लीः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scam


दिल्लीत द्वारकामधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थे (EPFO)च्या ऑनलाइन ऑफिसमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. ईपीएफओच्या अकाउंटमधून कोट्यवधी रुपये काढण्यात आलेत. ४ कोटी रुपये काढल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा हा पैसा आहे.

या प्रकरणी ईपीएफओने द्वारकामधील पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून ईपीएफओच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. घोटाळा किती मोठा आहे आणि त्यात कोण-कोण सामील आहे हे चौकशीतून स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

ईपीएफओद्वारे वर्षाचा ताळेबंद तपासण्यात येत असताना हा घोटाळा उघड झाला आहे. ऑनलाइन कॅश ट्रॅन्झॅक्शनची रक्कम आणि खात्यातील जमा रकमेत कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचं तपासणीत समोर आलं. काही ट्रॅन्झॅक्शन अशा अकाउंट्समध्ये झालेत ज्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नाही. यामुळे सुरुवातीला ईपीएफओद्वारे अंतर्गत चौकशी करण्यात आली होती.

बोगस खात्यात रक्कम ट्रान्स्फर

ईपीएफओच्या या ऑफिसमधून दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण देशातील ऑनलाइन अकाउंट हाताळले जातात. ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शनचे काम ईपीएफओने आउटसोर्स केले आहे. आउटसोर्सचे काम दिलेल्या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी १० बनावट नावं आणि पत्त्यांच्या आधारावर बँक अकाउंट उघडले. याच बोगस खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्स्फर केले गेलेत. घोटाळ्याची रक्कम खूप मोठी असल्याचं सांगण्यात येतंय.
लेखकाबद्दल
मनीष अग्रवाल
मनीष अग्रवाल, नवभारत टाइम्स में असिस्टेंट एडिटर हैं। वह केंद्रीय गृह मंत्रालय, रेलवे और एविएशन मिनिस्ट्री के अलावा केंद्रीय सड़क, परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय, पैरामिलिट्री फोर्स, सीबीआई, एनआईए, ईडी और भारतीय चुनाव आयोग भी कवर करते हैं। इससे पहले वह क्राइम, कस्टम और तिहाड़ जेल कवर करते थे। वह एनबीटी में 20 साल से भी अधिक समय से अपनी सेवाएं दे रहे हैं।... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज