अ‍ॅपशहर

फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ७ महिलांचा होरपळून मृत्यू, १० जखमी

हिमाचल प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2022, 2:21 pm
उना : हिमाचल प्रदेशात उनामधील बथू औद्योगिक वसाहतीत झालेल्या भीषण स्फोटात ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत होरपळून जखमी झालेल्या १० जणांना उना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटातील मृतांमध्ये सर्व महिला असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम explosion in  firecrackers factory seven dead and ten injured in himachal pradesh
फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ७ महिलांचा होरपळून मृत्यू, १० जखमी

फटाक्याच्या कारखान्यात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटात अनेक कामगार होरपळले आहेत. आज दुपारच्या सुमारास हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. या भीषण घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मदतही जाहीर केली आहे.


वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, १४ ठार; PM मोदींकडून शोक व्यक्त

हिमाचल प्रदेशातील स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत पंतप्रधान मदत निधीतून दिली जाईल, अशी पंतप्रधान मोदींनी पीएमओच्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

कारखान्यात होते ३० ते ३५ कामगार

स्फोटात जखमी झालेल्या ७ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे घटनेवळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेवेळी ३० ते ३५ कामगार काम करत होते, अशी माहिती जखमी महिलेने दिली. स्फोटात ७ महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज