अ‍ॅपशहर

कैसा ये इश्क हैं! भाच्याच्या प्रेमात मावशी आकंठ बुडाली, पतीला ओळखण्यासही नकार...

Love Affair: एखादी व्यक्ती जेव्हा प्रेमात असते तेव्हा तिला समाजाची, कुटुंबाची काहीही पर्वा नसते. आपलं प्रेम मिळवण्यासाठी ती व्यक्ती कुठल्याही संकाटाला सामोरे जायला तयार असते. अनेकदा यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. असंच काहीसं या प्रकरणात घडलं आहे.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2023, 3:49 pm
मुझफ्फरपूर: प्रेम हे कधीही कोणत्याही वयात कुणावरही होऊ शकतं, असं म्हणतात. मग हे प्रेम कुठलेही नर्बंध मानत नाही. अनेकदा यामुळे अनेक घरंही उद्ध्वस्त होतात. नातेसंबंध खराब होतात. असाच काहीसा प्रकार मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन परिसरात समोर आला आहे. जिथे एक विवाहित महिला आपल्याच मोठ्या बहिणीच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. म्हणजेच ही महिला आपल्याच भाच्याच्या प्रेमात आहे आणि इतकंच नाही तर तिला त्याच्यासोबतच राहायचं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Extra Marital Affair News


हे प्रकरण मुझफ्फरपूरच्या कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाताल असल्याची माहिती आहे. विवाहित महिला ही कांती पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. तर तिची मोठी बहीण ही कटरा गावात राहाते. प्रेमात वेडी झालेली ही महिला केवळ विवाहित नाहीये तर तिला दोन मुलंही आहेत.


काही दिवसांपूर्वी ही महिला बहिणीच्या सासरी गेली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तिच्या आणि बहिणीच्या मोठ्या मुलामध्ये जवळीक वाढू लागली. दोघांमध्ये प्रेमसूत जुळले. काही दिवसांनी तो तरुण आपल्या प्रेयसी असलेल्या मावशीला फिरायला कानपूरला घेऊन गेला. तेथून परतल्यावर त्याची वागणूक पाहून मोठ्या बहिणीला संशय आला. तिने कडक शब्दात लहान बहिणीची विचारपूस केल्यानंतर तिने मोठ्या बहिणीसमोर आपल्या भाच्यासोबतचे प्रेमसंबंध मान्य केले.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले; वाटेत कार पलटी अन् कुटुंबातील चौघांनी जीव गमावला
सामाजिक स्तरावर पंचायत बसवून हे प्रकरण न सुटल्याने अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. विवाहितेने पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा केला. नात्याचा हवाला देऊन सर्व नातेवाईक तिला समजावत राहिले. पण, ती कोणाचंही काही मानायला तयार नव्हती. इतकंच काय तर तिने पोलिसांसमोर पतीला ओळखण्यासही नकार दिला. मात्र, पोलिसांत अद्याप याबाबत कुठली तक्रार करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलीस आपआपसात हे प्रकरण सोडवण्याचा सल्ला देत होते.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
दुसरीकडे कुटुंबातील सदस्य विवाहित महिलेला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ती प्रत्येक संकटाला तोंड द्यायला तयार आहे पण त्याच्या प्रियकराची साथ सोडायला तयार नाही. पोलीस सध्या याप्रकरणी तक्रारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या हे प्रकरण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख