अ‍ॅपशहर

१३०० किमी पायपीट, २५ दिवस, ८ रुग्णालयं; कुटुंबाची धडपड व्यर्थ, ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

शाळेत असलेल्या माठातील पाणी पिणाऱ्या दलित विद्यार्थ्याला उच्चवर्णीय शिक्षकानं मारहाण केली. राजस्थानच्या जालोरमधील या घटनेची देशभरात चर्चा झाली. शिक्षकाच्या मारहाणीनंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. २० जुलैला मारहाण झाल्यानंतर जवळपास २५ दिवस उपचारांसाठी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांची भटकंती सुरू होती.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 3:02 pm
जालोर: शाळेत असलेल्या माठातील पाणी पिणाऱ्या दलित विद्यार्थ्याला उच्चवर्णीय शिक्षकानं मारहाण केली. राजस्थानच्या जालोरमधील या घटनेची देशभरात चर्चा झाली. शिक्षकाच्या मारहाणीनंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. २० जुलैला मारहाण झाल्यानंतर जवळपास २५ दिवस उपचारांसाठी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांची भटकंती सुरू होती. इंद्र कुमार मेघवाल असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalore dalit boy
शिक्षकानं मारहाण केलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू


इंद्र कुमारची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीयांनी गेल्या २५ दिवसांत जवळपास १ हजार ३०० किमीचा प्रवास केला. राजस्थान आणि गुजरातमधील आठ रुग्णालयांमध्ये इंद्र कुमार यांच्यावर उपचार झाले. १३ ऑगस्टला अहमदाबादमधील रुग्णालयात इंद्र कुमारचा मृत्यू झाला. शाळेत असलेल्या माठातील पाणी प्यायल्यानं उच्चवर्णीय शिक्षकानं इंद्र कुमारला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
माझ्या जीवावर मजा मारली, केस स्ट्रेटनिंग केले! प्रेयसीमुळे कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल
दलित कुटुंबातील ९ वर्षांच्या इंद्र कुमारला २० जुलैला मारहाण झाली. सुराणा गावात हा प्रकार घडला. या प्रकरणी जालोरच्या सामाजिक न्याय विभागाचे सहायक संचालक सुभाष चंद्र मणी यांनी इंद्र कुमारचे वडील देवाराम आणि त्याचे काका यांच्याशी संवाद साधून एक अहवाल तयार केला आहे. त्यांनी हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवला आहे.

२० जुलैला सकाळी ७ वाजता इंद्र कुमार शाळेत गेला. १०.३० ते ११ दरम्यान मधल्या सुट्टीत तो शिक्षक आणि शाळेचे मालक चैल सिंह यांच्यासाठी असलेल्या माठातून पाणी पित होता. यावेळी सिंह यांनी इंद्र कुमारला पाहिलं. त्यांनी त्याला मारहाण केली. इंद्रच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला. तो तिथेच कोसळला. शाळा सुटल्यावर इंद्र त्याच्या वडिलांच्या पंक्चर दुकानात गेला. त्यानं घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. कान जास्त दुखत असल्यानं कुटुंबानं मेडिकल दुकानातून औषधं आणली. मात्र वेदना कमी झाल्या नाहीत.
आता १० हजार देते, ५० नंतर; पण माझा मुलगा संपला पाहिजे! आईनंच दिली मुलाच्या हत्येची सुपारी
कुटुंबातील सदस्यांनी इंद्र कुमारला जालोरपासून १३ किमीवर असलेल्या बगोडा येथील रुग्णालयात नेलं. वेदना कमी झाल्यावर त्याला घरी आणलं. मात्र एक-दोन दिवसांत त्रास पुन्हा वाढला. इंद्रला घरापासून ५० किमीवर असलेल्या आस्था मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी वेदना कमी झाल्यानं त्याला डिस्चार्ज मिळाला. पुढल्या दिवशी वेदना पुन्हा वाढल्या. इंद्र कुमारला भिनमल येथील त्रिवेणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे २ दिवस त्याच्यावर उपचार झाले.

दुसऱ्या दिवशी त्रास आणखी वाढला. इंद्र कुमारला घरापासून १५५ किमीवर असलेल्या दिसामध्ये दाखल करण्यात आलं. गुजरातमध्ये असलेल्या दिसा येथील कर्णी रुग्णालयात इंद्र कुमारवर उपचार झाले. २४ तासांनंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. कुटुंब पुन्हा राजस्थानला परतलं. इंद्र कुमारला पुन्हा त्रास झाल्यानं त्याला पुन्हा गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आसं. १३ ऑगस्टला दुपारी साडे अकरा वाजता त्यानं निधन झालं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख