अ‍ॅपशहर

सरकार कृषी कायदे रद्द करणार नाही, शहांसोबतची शेतकरी नेत्यांची बैठक फिस्कटली

दिल्लीच्या सीमांवर गेल्या १२ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली होती. शेतकरी नेत्यांसोबत जवळपास २ तास बैठक चालली. पण या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2020, 8:46 am
नवी दिल्लीः सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये ( farmers protest ) उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे, असे शेतकरी नेते हनान मुल्ला म्हणाले. शेतकरी संघटनांच्या नेत्यांना उद्या या संदर्भात ( farmer leader ) लेखी प्रस्ताव पाठवला जाईल, असे गृहमंत्री अमित शहा ( amit shah ) म्हणाले. यानंतर सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी नेते बैठक घेतील, अशी माहिती हनान मुल्ला यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer protest
सरकार कृषी कायदे रद्द करणार नाही, शहांसोबतची शेतकरी नेत्यांची बैठक फिस्कटली


सरकार उद्या प्रस्ताव देईल. गृहमंत्र्यांनी लेखी प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रस्तावावर शेतकरी विचार करतील. सरकार कायद्यातील सुधारणेसाठी लेखी प्रस्ताव देईल, असं शेतकरी नेते हनान मुल्ला म्हणाले. म्हणजेच आजची बैठकही निरर्थक आहे. उद्या सरकारशी बैठक होणार नाही, असेही हनान मुल्ला यांनी बैठकीनंतर सांगितलं.

कृषी कायद्यांना विरोध; शरद पवारांसह विरोधी पक्षातील ५ नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार

सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. यामुळे शेतकरी नेते आणि सरकारमध्ये उद्या कुठलीही बैठक होणार नाही. कृषी कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव शेतकरी संघटनांना उद्या पाठवला जाईल. हा प्रस्ताव आल्यानंतर शेतकरी संघटनांची उद्या दुपारी १२ वाजता बैठक होईल. सिंघू सीमेवर ही बैठक घेण्यात येईल, अशी माहिती हनान मुल्ला यांनी दिली.

शेतकरी आंदोलन- काय झालं दिवसभरात... वाचा...

'मी सरकारमध्ये असतो, तर त्वरीत कायदा रद्द केला असता'

शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू; कुटुंबीय म्हणाले, 'थंडीमुळे मृत्यू झाला'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शेतकरी संघटनांच्या १३ नेत्यांमध्ये आज बैठक झाली. ही बैठक जवळपास २ तास चालली. रात्री वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री ११ वाजता संपली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारने कायदे रद्द करण्यास इन्कार केल्याने ही बैठकही निष्फळ ठरली. आता उद्या होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकार शेतकरी नेत्यांना काय प्रस्ताव देते आणि या बैठकी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज