अ‍ॅपशहर

प्रवासात जोडप्याची बॅग गायब झाली; ८३ हजारांची भारपाई द्या, कोर्टाचे रेल्वेला निर्देश

ग्राहक आयोगाने एका जोडप्याला पाच वर्षांनी न्याय दिला आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि बॅग गहाळ झालेल्या प्रवासी जोडप्याला ८३ हजार भरपाई देण्याचे निर्देश आयोगाने रेल्वेला दिले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2022, 3:39 pm
बरेली : एका जोडप्याला ५ वर्षानंतर कोर्टाकडून न्याय मिळाला आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (NCDRC) सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत उत्तर रेल्वेच्या महाव्यावस्थापकांना, गाझियाबाद स्टेशन मॅनेजर आणि तिकीट तपासणाऱ्या टीटीईला दंड सुनावला आहे. आयोगाने जोडप्याला ८३, ३९२ रुपये भरपाई देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. या जोडप्याची बॅग पाच वर्षांपूर्वी रेल्वेतून हरवली होती. हे प्रकरण पाच वर्षे चालले. या प्रकरणी आयोगाने या आठवड्याच्या सुरवातीला हे निर्देश दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम national consumer disputes redressal commission
प्रवासात जोडप्याची बॅग गायब झाली; ८३ हजारांची भारपाई द्या, कोर्टाचे रेल्वेला निर्देश


८ ऑगस्ट २०१७ मध्ये कामाख्या एक्स्प्रेसने पन्नाशीत असलेले पीडित जोडपे हे जोधपूरहून बरेलीला चालले होते. यादरम्यान गाझियाबादजवळ त्यांची बॅग एक्स्प्रेसमधून गायब झाली. या बॅगेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तुही होत्या. बरेलीला उतरल्यानंतर त्यांनी सत्येंद्र त्रिपाठी यांनी पोलिसात तक्रार (जीआरपी) केली.

पत्नीसह एसी-२ टायर डब्यातून एक्स्प्रेसने मी प्रवास करत होतो. आमचा डबा हा स्लीपर कोचला लागून होता. अनेक प्रवासी आमच्या डब्यात घुसत होते. यावरून आपण तिकीट तपासणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला दोन्ही डब्यांना जोडणारे गेट बंद करण्यास सांगितले. पण त्याने आपल्या म्हणण्याकडे कानाडोळा, असा आरोप त्रिपाठी यांनी तक्रारीत केला होता.

आम्ही आमच्या बॅग आणि सामनाबद्दल अधिक सतर्क होतो. यामुळे रेल्वे प्रवासात आम्ही रात्रभर जागे होते. गाझियाबादमध्ये एक्सप्रेसने प्रवेश करताच आम्ही आमच्या बॅग बघितल्या. तर आमची बॅग गायब झालेली होती. त्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाइल फोन होते. आम्ही बरेलीला उतरल्यानंतर जीआरपी पोलिसात एफआयआर दाखल केला. यानंतर आमचे प्रकरण गाझीयाबादला वर्ग करण्यात आले, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

प्रेमसंबंधातून प्रसिद्ध व्यावसायिकाच्या सुनेची हत्या; एका शर्टवरून पोलिसांनी लावला खुनाचा छडा

प्रवाशाने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही ठोस पुरवा दिला नाही. लगेजची पावतीही सादर केली नाही. यामुळे त्यांच्या सामानाला आणि हरवलेल्या मौल्यवान वस्तुंना रेल्वे जबाबदार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रवासी आणि रेल्वेतील या प्रकरणावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. हे युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगाच्या पीठाचे प्रमुख प्रवीण कुमार जैन आणि शैलजा सचन यांनी पीडित प्रवासी त्रिपाठी यांना ७८,३९२ रुपये बॅग गहाळ झाल्याप्रकरणी भरपाई देण्याचे निर्देश रेल्वेला दिले. तसंच या प्रकरणासाठी खर्चाची भरपाई म्हणून ५ हजार रुपये देण्याची सूचना केली. ही भरपाई दोन महिन्यात म्हणजे ६० दिवसात देण्याचे निर्देश दिले.

महत्वाचे लेख