अ‍ॅपशहर

ओडिशा: दोन लाख नागरिकांना पुराचा तडाखा

​ओडिशातील जाजपूर आणि केंद्रपारा जिल्ह्यांमधील पूरस्थिती जैसे थे असून नागरिकांचं जनजीवन ठप्प झालंय. केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टमुंडई तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येणारी काही गावं, तसंच अऊल तालुक्यातील काही गावांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे.

Maharashtra Times 31 Jul 2017, 10:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त। भुवनेश्वर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम flood situation in odishas jajpur kendrapara districts remains grim
ओडिशा: दोन लाख नागरिकांना पुराचा तडाखा


ओडिशातील जाजपूर आणि केंद्रपारा जिल्ह्यांमधील पूरस्थिती जैसे थे असून नागरिकांचं जनजीवन ठप्प झालंय. केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टमुंडई तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येणारी काही गावं, तसंच अऊल तालुक्यातील काही गावांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे.

केंद्रपारा जिल्ह्यातून वाहणाऱ्य़ा ब्राह्मणी आणि कुसभद्रा या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पत्रापूर, अलवा आणि इंदुपूर या गावांना धोका निर्माण झाला आहे.

जजपूर जिल्ह्यात पुरामुळे सात जण वाहून गेले असून आणखी तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबरोबर कलाहांडी आणि मलकनगिरी जिल्ह्यात प्रत्येकी दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.



अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.

आलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून बारी तालुक्यात एकूण ३५ केंद्रांमध्ये मोफत किचन उघडण्यात आल्याचे विशेष मदत आयुक्तांनी सांगितले. पूरग्रस्त भागांमधील गुरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पूरग्रस्त भागांमध्ये वीज देखील खंडित असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.



आऊल तालुक्यातील मानपूर, तसेच पट्टामुडई तालुक्यातील श्रीरामपूरमध्ये पुराच्या पाण्यात फसलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी बोटींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

पंतप्रधान उद्या आसामला देणार भेट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवार) आसामला भेट देणार आहेत. आसाममध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काय करता येईल याबाबत पंतप्रधान चर्चा करणार आहेत. आसाममध्ये एकूण दोन बैठका घेतल्यानंतर पंतप्रधान संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील अशी माहिती आसामच्या अर्थमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज