अ‍ॅपशहर

पाकिस्तानी पत्नीला या जिल्ह्यात 'नो एंट्री'!

भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावामुळे गुजरातमधील भुजचा रहिवासी असलेल्या अल्ताफ पालेजाला आपल्या पत्नीला घरी आणता येणार नाही. कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे अल्ताफची पत्नी सीद्रा हिला आपल्या बाळासह पतीचे हक्काच्या घरात जाता येत नाही.

Maharashtra Times 13 Dec 2016, 10:39 am
सईद खान। अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम for bhuj man and pak wife curbs make life honeymoon couple in india pak thaw
पाकिस्तानी पत्नीला या जिल्ह्यात 'नो एंट्री'!


भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावामुळे गुजरातमधील भुजचा रहिवासी असलेल्या अल्ताफ पालेजाला आपल्या पत्नीला घरी आणता येणार नाही. कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे अल्ताफची पत्नी सीद्रा हिला आपल्या बाळासह पतीच्या हक्काच्या घरात येता येणार नाही.

पाकिस्तानमधील कराची येथे राहणारी सीद्रा आणि तिचे कुटुंबिय याआधी काही महिन्यांपूर्वी ही भारतात आले होते. मात्र, कच्छमध्ये राहता येणार नसल्याच्या अटीवर त्यांना व्हिसा देण्यात आला होता. त्यावेळी सीद्रा आणि तिच्या कुटुंबियांनी कच्छ जिल्ह्याजवळील मोब्रीमधील हॉटेलमध्ये राहावे लागले होते. मोब्रीमध्येदेखील पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणास्तव कोणीही घर भाड्याने राहण्यास दिले नसल्याचे अल्ताफ पालेजाने सांगितले. त्यावेळीदेखील माझ्या घरच्या आणि सासरच्या मंडळींना हॉटेलमध्ये ठेवणे ही त्रासदायक बाब असल्याचे ही पालेजाने म्हटले.

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी अल्ताफची पत्नी, त्यांचे बाळ आणि त्याच्या सासूला व्हिसा मंजूर केला असला तरी त्यांना कच्छ जिल्हा सोडून इतर कोणत्याही ठिकाणी राहण्याची परवानगी दिली आहे. माझ्या कुटुंबियांसोबत माझी पत्नी का राहू शकत नाही याचे उत्तर प्रशासनाकडे नसल्याचे अल्ताफने सांगितले. अनेक पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन वास्तव्याच्या व्हिसावर कच्छमध्ये राहत असताना माझ्या पत्नीला कच्छमध्ये प्रवेश का नाही हे समजत नसल्याचे अल्ताफने म्हटले.

कच्छचे खासदार विनोद चावडा यांनीदेखील उच्चायुक्त कार्यालयाला पत्र लिहून याप्रकरणी सहानुभूतीने विचार करत अल्ताफच्या पत्नीला भूजमध्ये राहण्यास मंजूरी देण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज