अ‍ॅपशहर

स्वराज यांच्या 'टि्वटर डिप्लोमसी'चा सन्मान

'टि्वटर डिप्लोमसी' नावाचा अनोखा प्रकार प्रचलित केल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार मॅगझिनने '१५ ग्लोबल थिंकर्स' च्या यादीत स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटरवरूनच सुषमा स्वराज यांचे अभिनंदन केले आहे.

Maharashtra Times 14 Dec 2016, 3:04 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम for novel twitter diplomacy sushma swaraj named a 2016 global thinker by foreign policy magazine
स्वराज यांच्या 'टि्वटर डिप्लोमसी'चा सन्मान


'टि्वटर डिप्लोमसी' नावाचा अनोखा प्रकार प्रचलित केल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार मॅगझिनने २०१६ च्या '१५ ग्लोबल थिंकर्स' च्या यादीत स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटरवरूनच सुषमा स्वराज यांचे अभिनंदन केले आहे. या यादीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, जर्मन चॅंसेलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव बान की मून आदींचा समावेश आहे.

जेव्हापासून परराष्ट्र खात्याची सूत्रं स्वराज यांनी हाती घेतली आहेत, तेव्हापासून त्या टि्वटरच्या मदत मागणाऱ्या प्रत्येक टि्वटला प्रतिसाद देत आहेत, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या तत्काळ कार्यवाही करत आहेत. समस्या लहान असो वा मोठी, त्या ती तडीस नेतात. आजारी असताना रुग्णालयात दाखल असतानाही त्यांनी लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. यात भारतीय तसेच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका ब्रिटीश दाम्पत्याला त्यांच्या सरोगसीद्वारे झालेल्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी तिला ब्रिटीश पासपोर्ट मिळण्यासाठी मदत केली होती. त्यांनी आखातातल्या १० हजार स्थलांतरित मजुरांना सोडवले होते. वॉशिंग्टन पोस्टने स्वराज यांचा उल्लेख 'सुपरमॉम' असा केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज