अ‍ॅपशहर

शिकारीचे फोटो अपलोड करणे पडले महागात

पक्षाची शिकार करून मृत पक्षाचा फोटो फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर लोड करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. नागराज असे या व्यक्तीचे नाव असून तो श्रवणबेळगोळमधील श्रीकांता नगरातील रहिवाशी आहे. नागराजला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 5:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त। बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम foreign bird hunt man arrested
शिकारीचे फोटो अपलोड करणे पडले महागात


पक्षाची शिकार करून मृत पक्षाचा फोटो फेसबुकवर आणि व्हॉट्सअॅपवर लोड करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. नागराज असे या व्यक्तीचे नाव असून तो श्रवणबेळगोळमधील श्रीकांता नगरातील रहिवाशी आहे. नागराजला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

गेल्या रविवारी (१३ ऑगस्ट) नागराज आणि त्याच्या मित्रांनी के आर पेट तालुक्यातील एका तलावात रंगीत कारकोचा पक्षाची शिकार केली. त्यानंतर त्यांनी या पक्षाला श्रवणबेळगोळजवळ शिजवून खाल्ले. इतक्यावरच न थांबता नागराज आणि त्याच्या मित्रांनी मृत पक्षाचे फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अपलोड केले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार वन अधिकाऱ्याच्या लक्षात आला आणि त्याने सोशल मीडियावरून या शिकाऱ्यांचा माग काढला. नागराजचा व्हॉट्सअॅप नंबर असल्याने त्याला काही वेळातच अटक केली. या कृत्यात सहभागी असलेले नागराजचे इतर मित्र मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे. नागराज आणि त्याच्या मित्रांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज