अ‍ॅपशहर

Sheila Dikshit: शीला दीक्षितांकडे पुन्हा दिल्ली काँग्रेसची धुरा

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या ८० वर्षीय शीला दीक्षित यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस श्रेष्ठींनी पुन्हा एकदा दिल्ली काँग्रेसची धुरा शीला यांच्याकडे सोपवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 7:06 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sheila-Dikshit


दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या ८० वर्षीय शीला दीक्षित यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस श्रेष्ठींनी पुन्हा एकदा दिल्ली काँग्रेसची धुरा शीला यांच्याकडे सोपवली आहे.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाकडून ही जबाबदारी शीला दीक्षित यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. अनुभवी आणि बुजुर्ग नेत्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.

काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी या नियुक्तीची घोषणा केली. याबाबत पत्रकारांनी शीला दीक्षित यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, पक्षाने जी संधी दिली आहे, तो मी माझा सन्मान समजते, अशा भावना शीला यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, मध्य प्रदेशात कमलनाथ आणि राजस्थानात अशोक गेहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा देत अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकणाऱ्या काँग्रेसने दिल्लीतही नवा अध्यक्ष नेमताना अनुभवी नेतृत्वालाच झुकतं माप दिलं आहे. शीला दीक्षित तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज