अहमदाबाद :
गुजरातचे माजी मंत्री शंकरसिंग वाघेला हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. ७८ वर्षीय वाघेला हे पूर्वी भाजपमध्ये होते. नंतर अनेक वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले.
२०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला. त्यावेळी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. वाघेला हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी दिली.