अ‍ॅपशहर

manmohan singh : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग करोना पॉझिटिव्ह, एम्समध्ये दाखल

करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने दिल्ली सरकारने राजधानीत लॉकडाउन घोषित केला आहे. आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले गेलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2021, 7:09 pm
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान मनमोहनसिंग ( manmohan singh ) यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एम्समध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एम्स हॉस्पिटल प्रशासनाने ही माहिती दिली आहे, एएनआयने हे वृत्त दिलं आहे. मनमोहन सिंग ८८ वर्षांचे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manmohan singh
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग करोना पॉझिटिव्ह, एम्समध्ये दाखल


देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून मनमोहन सिंग ( Former PM Manmohan Singh ) यांनी कालच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. मनमोहनसिंग यांनी करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणा आणण्यासाठी पत्रातून काही उपाय सरकारला सुचवले होते. या पत्राला आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं. मनमोहन सिंग यांनी सांगितलेले सर्व उपाय आपण आठवड्याभरापूर्वीच सुरू केले आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांना घरातच राहून लॉकडाउनमध्ये पालन करावं लागणार आहे. २६ एप्रिलपर्यंत म्हणजे एक आठवड्याचा हा लॉकडाउन आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज