चंडीगड : शाळेच्या व्हॅनला आग लागून चार मुले होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी संगरूर जिल्ह्यात घडली. या व्हॅनमधून १२ मुले प्रवास करीत होती. त्यावेळी ही घटना घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तातडीने आठ मुलांना बाहेर काढले. मात्र चार मुलांना वाचविता आले नाही. यात तीन वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आग लागून चार मुले मृत्युमुखी
शाळेच्या व्हॅनला आग लागून चार मुले होरपळून मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी संगरूर जिल्ह्यात घडली या व्हॅनमधून १२ मुले प्रवास करीत होती...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2020, 4:00 am