अ‍ॅपशहर

मंदिरात चेंगराचेंगरी चार ठार

येथील अथिवररदार मंदिरात मिरवणुकीवेळी चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती आधीच बिघडलेली असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 19 Jul 2019, 4:00 am
कांचीपुरम : येथील अथिवररदार मंदिरात मिरवणुकीवेळी चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती आधीच बिघडलेली असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four dead in stampede in the temple
मंदिरात चेंगराचेंगरी चार ठार


चेन्नईपासून ७० किलोमीटरवर कांचीपुरम असून, तेथील अथिवररदार मंदिरात दर ४० वर्षांतून एकदा अथि देवतेची मूर्ती पाण्याबाहेर काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदा एक जुलैपासून हा सोहळा सुरू झाला आहे. त्यामुळे मंदिरात सध्या प्रचंड गर्दी होत आहे. या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. मृत भाविकांपैकी दोन महिलांसह तिघांचे वय ५० हून अधिक होते. एक जण आंध्र प्रदेशातील २१ वर्षांचा तरुण आहे. मृतांच्या वारसांना तमिळनाडू सरकारने प्रत्येकी एक लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. या मंदिरात गुरुवारी सुमारे १.७० लाख भाविक होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. या ठिकाणच्या अव्यवस्थेमुळेच भाविकांचा बळी गेल्याची टीका विरोधी पक्षीय नेत्यांनी सभागृहात केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज