अ‍ॅपशहर

मार्शल अर्जन सिंग यांना अखेरचा निरोप

भारतीय हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिंग यांच्या सन्मानार्थ राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ब्ररार स्क्वेअर येथे जाऊन अर्जन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Maharashtra Times 18 Sep 2017, 11:28 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम funeral of marshal arjan singh
मार्शल अर्जन सिंग यांना अखेरचा निरोप


भारतीय हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिंग यांच्या सन्मानार्थ राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ब्ररार स्क्वेअर येथे जाऊन अर्जन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मार्शल अर्जन सिंग हे ‘फाइव्ह स्टार रँक’ मिळवणारे हवाई दलातील एकमेव अधिकारी होते. शनिवारी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. आज त्यांचे पार्थिव दिल्लीच्या ब्ररार सेक्वेअरमध्ये आणण्यात आले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, निर्मला सीतारामन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बंदुकीच्या १७ फेऱ्या हवेत झाडून सिंग यांना सलामी देण्यात आली. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

खरा नायक

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अर्जन सिंग यांनी अजोड कामगिरी बजावली होती. त्यांच्या नेतृत्वात हवाई दलाने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानची हवाई तळं नष्ट केली होती. त्यांनी या युद्धात ६० हून अधिक विमाने उडवून पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊनच त्यांना 'फाईव्ह स्टार रँक' देऊन सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते. १९६४ ते १९६९ या काळात त्यांनी हवाई दल प्रमुख म्हणून कामगिरी बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांना स्वित्झर्लंडचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. व्हॅटिकनमध्येही त्यांनी भारताचे राजदूत म्हणून सेवा दिली होती. १९७४ मध्ये ते केनियात भारताचे उच्चायुक्त होते. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य आणि दिल्लीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये त्यांना हवाई दलाचे मार्शल बनविण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज