अ‍ॅपशहर

पतीने जुगारात हरल्यानंतर पत्नीवर बलात्कार

पांडवांनी द्युतात 'द्रौपदी'ला गमावल्यानंतर महाभारत घडलं होतं. पुराणातल्या या कथेसारखीच घटना मध्य प्रदेशमधल्या इंदुरमध्ये घडली आहे. पतीने आपल्याला जुगारात हरवल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ज्यांनी तिला जिंकलं त्या दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचाही तिचा आरोप आहे.

Maharashtra Times 12 Jul 2017, 3:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इंदुर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gangrape in indore over loosing in gambling
पतीने जुगारात हरल्यानंतर पत्नीवर बलात्कार


पांडवांनी द्युतात 'द्रौपदी'ला गमावल्यानंतर महाभारत घडलं होतं. पुराणातल्या या कथेसारखीच घटना मध्य प्रदेशमधल्या इंदुरमध्ये घडली आहे. पतीने आपल्याला जुगारात हरवल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ज्यांनी तिला जिंकलं त्या दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचाही तिचा आरोप आहे.

महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती शर्मा यांनी माहिती दिली की या आरोपांची चौकशी करण्यासाठी आम्ही संबंधित पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. अद्याप आरोपांची सत्यता पडताळून पाहिलेली नाही, त्यामुळे एफआयआर दाखल केलेला नाही.

मंगळवारी झालेल्या जनसुनावणीदरम्यान (पोलीसांसमोर दर आठवड्याला होणारी सुनावणी) आपल्या पतीने काही दिवसांपूर्वी आपल्याला जुगारात लावले आणि तो हरला. परिणामी या डावात जिंकणारे नौशाद आणि घनश्याम या दोघांनी आपल्यावर सामुहिक बलात्कार केला असा आरोप पत्नीनं केला आहे. या घटनेनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लाहली. पण तिचा पती आणि तिला जुगारात जिंकणारे दोघेजण तिला त्रास देत आहेत, अशी तिची तक्रार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज