अ‍ॅपशहर

गाझियाबादमध्ये करोनाचा रुग्ण, संख्या ३० वर

करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनाचा आणखी एक रुग्ण गाझियाबादमध्ये आढळून आला आहे. वैद्यकीय तपासणीत त्याला करोना झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यासह करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे. गुरुग्राममधील पेटीएम कंपनीतील एका कर्मचाऱ्याला बुधवारी रात्री करोना झाल्याचं समोर आलं होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2020, 6:17 pm
गाझियाबादः करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनाचा आणखी एक रुग्ण गाझियाबादमध्ये आढळून आला आहे. वैद्यकीय तपासणीत त्याला करोना झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यासह करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे. गुरुग्राममधील पेटीएम कंपनीतील एका कर्मचाऱ्याला बुधवारी रात्री करोना झाल्याचं समोर आलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus-india
File Photo


गाझियाबादमधील व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंन्शनमध्ये राहणारी ही व्यक्ती आहे. ही व्यक्ती २३ फेब्रुवारीला इराणची राजधानी तेहराणमधून मायदेशात दाखल झाली होती. आता त्याच्यावर दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

करोनाचा संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जातेय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती भवनने होळीचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. इटली आणि दक्षिण कोरियातून मायदेशात दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिश शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

करोना: दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद

भय करोनाचे! लोकसभेत खासदार राणा यांनी मास्क लावून...

'भारतीय पद्धत अवलंबवा अन् करोनापासून वाचा'

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटारी सीमेवर पाकिस्तानमधून येणाऱ्या ट्रक चालकांची करोनाची तपासणी करण्यात येत आहे.

करोनामुळे जगभरात आतापर्यंत ३,२०० हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. चीनमध्येच करोनाने ३ हजार बळी घेतलेत जगभरात करोनाचे ९५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ८५ देशांमध्ये करोना फोफावला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज