अ‍ॅपशहर

विमानाचं तिकीट फक्त ३१२ रुपये!

विमानाचं तिकीट फक्त ३१२ रुपये! विश्वास बसणार नाही पण देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या गोएअर कंपनीने हा स्वस्त विमानप्रवासाचा 'बंपर धमाका' केला असून देशातील सहा शहरांमधील प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

Maharashtra Times 24 Nov 2017, 8:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goair offers heavy discounts on select routes
विमानाचं तिकीट फक्त ३१२ रुपये!


विमानाचं तिकीट फक्त ३१२ रुपये! विश्वास बसणार नाही पण देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या गोएअर कंपनीने हा स्वस्त विमानप्रवासाचा 'बंपर धमाका' केला असून देशातील सहा शहरांमधील प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. वाडीया ग्रुपच्या गोएअर कंपनीचं मुख्यालय मुंबईत असलं तरी या ऑफरमधून मुंबईला मात्र वगळण्यात आलं आहे.

दिल्ली, कोची, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनऊमधील प्रवाशांना या स्वस्त तिकीटाचा लाभ मिळणार आहे. या सवलतीच्या दरातील तिकीटाचं बुकिंग आजच सुरू करण्यात आलं असून २९ नोव्हेंबरपर्यंत हे बुकिंग सुरू राहणार आहे. १ डिसेंबर ते २८ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या आरक्षणासाठी ही ऑफर असणार आहे.

वरील सहा शहरांमध्ये एकमार्गी प्रवासासाठी हा तिकीटदर असणार आहे. यापैकी कोणत्याही शहरात तुम्ही ३१२ रुपयांत जाऊ शकणार आहात. ही मर्यादित ऑफर असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर हे आरक्षण होईल, असेही कंपनीने नमूद केले आहे. अन्य टॅक्स यात समाविष्ट नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज