अ‍ॅपशहर

'पाकिस्तानात जाणं नरकात जाण्यासारखंच'

'पाकिस्तानात जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखंच आहे. दहशतवादाला आश्रय देण्याचे परिणाम आज पाकला भोगावे लागत आहेत. भारताशी समोरासमोर लढण्याची हिम्मत नसल्यानेच ते सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून भ्याड हल्ले करत आहेत', अशा शब्दांत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानवर हल्ला चढवला.

Maharashtra Times 16 Aug 2016, 3:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रेवाडी (हरयाणा)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम going to pakistan is same as going to hell manohar parrikar
'पाकिस्तानात जाणं नरकात जाण्यासारखंच'


'पाकिस्तानात जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखंच आहे. दहशतवादाला आश्रय देण्याचे परिणाम आज पाकला भोगावे लागत आहेत. भारताशी समोरासमोर लढण्याची हिम्मत नसल्यानेच ते सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून भ्याड हल्ले करत आहेत', अशा शब्दांत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानवर हल्ला चढवला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच काल काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवगळ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर प्रमोद कुमार शहीद झाले, तर सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज येथे एका कार्यक्रमात बोलताना पर्रीकर यांनी तीव्र चीड व्यक्त केली.

पर्रीकर म्हणाले, पाकिस्तानकडून वारंवार भारताविरोधात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जात आहेत. तिथे आश्रय घेणारे दहशतवादी भारतात घुसखोरी करत आहेत. १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि नंतर कारगिल अशा चारही वेळा भारताविरूद्ध छेडलेल्या युद्धांत तोंडावर आपटल्यानंतर पाकिस्तानने हा दहशतीचा मार्ग अवलंबलाय. मात्र, ही दहशत आम्ही चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आधी सीमेपलीकडून कारवाई झाल्यास आमचे जवान प्रत्युत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहायचे पण ही परिस्थिती आता बदलली आहे. शत्रूच्या एका गोळीचं उत्तर दहा गोळ्या झाडून द्या, असे आदेश आम्ही दिलेले आहेत, असे पर्रीकर यांनी ठणकावून सांगितले. शत्रूशी लढताना शहीद न होता शत्रूलाच यमसदनी धाडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी जवानांना केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज