अ‍ॅपशहर

covid second wave : 'केंद्राच्या चुकीच्या निर्णयांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ५० लाख भारतीयांचा मृत्यू'

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात करोना महामारीच्या व्यवस्थापनावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० लाख भारतीयांचा मृत्यू झालाच्या आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2021, 2:24 am
नवी दिल्लीः करोना महामारीदरम्यान मृत्युंवरून ( Covid Death In India ) आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बुधवारी निशाणा साधला. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ( covid second wave ) देशात ५० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशात करोना संसर्गाने आतापर्यंत ४.१८ लाखा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा सरकारने दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid deaths in india
'केंद्राच्या चुकीच्या निर्णयांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ५० लाख भारतीयांचा मृत्यू' (file photo )


राहुल गांधींनी आपल्या ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. 'सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट'चे एक संशोधन राहुल गांधी यांनी या ट्वीटमधून शेअर केले आहे. यात करोना महामारीच्या सुरवातीपासून ते जून २०२१ पर्यंत तीन वेगवेगळ्या डेटा स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या अधारावार मृत्यू दराचा अंदाज लावण्यात आला आहे. हे संशोधन राहुल गांधी शेअर केले आहे. 'करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारत सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशातील आपल्या ५० लाख बंधू, भगिनी, माता-पित्यांचा बळी घेतला आहे. हे सत्य आहे', असं राहुल गांधी म्हणाले.

oxygen shortage death : 'महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने ऑक्सिजन अभावी करोनाने एकही

coronavirus india : आसामच्या महिला डॉक्टरला करोनाच्या दोन वेरियंटचा संसर्ग; लसीचे दोन्ही डोस

राहुल गांधी यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांचा वारसांना केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. 'आपल्या जीवलगांना गमावणाऱ्यांच्या आश्रूंमध्ये सर्व नोंदलं गेलं आहे', असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख