अ‍ॅपशहर

गुरगाव नव्हे 'गुरुग्राम'... नामांतरावर शिक्कामोर्तब

हरयाणातील गुरगाव जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यापुढं गुरगाव शहर व जिल्हा 'गुरुग्राम' या नावानं ओळखला जाणार आहे. केंद्र सरकारनं हा नामांतराचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 9:44 am
मटा ऑनलाइन वृत्त । गुरुग्राम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम good morning gurugram the names official
गुरगाव नव्हे 'गुरुग्राम'... नामांतरावर शिक्कामोर्तब

हरयाणातील गुरगाव जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यापुढं गुरगाव शहर व जिल्हा 'गुरुग्राम' या नावानं ओळखला जाणार आहे. केंद्र सरकारनं हा नामांतराचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.

महाभारतापासून प्रेरणा घेऊन हरयाणा सरकारनं हा प्रस्ताव ठेवला होता. मागील एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत केंद्रानं त्यास मान्यता दिली. येत्या १ नोव्हेंबर रोजी हरयाणा राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळंच केंद्रानं नामांतराला तातडीनं मान्यता दिल्याचं बोललं जात आहे.

मी गुरगावच म्हणणार: योगेंद्र यादव

गुरगावचं नामांतर 'गुरुग्राम' करण्याच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. मात्र, आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले व नंतर 'स्वराज अभियान'ची स्थापना करणारे योगेंद्र यादव यांनी मी गुरगावच म्हणेन,' असं स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज