अ‍ॅपशहर

उपराष्ट्रपतीः 'यूपीए'ची गांधींना उमेदवारी

संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. आज झालेल्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत.

Maharashtra Times 11 Jul 2017, 1:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gopalkrishna gandhi is oppositions nominee for vice president
उपराष्ट्रपतीः 'यूपीए'ची गांधींना उमेदवारी


संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. आज झालेल्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधी, अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह टीएमसी, सपा, बसपा, आरजेडी, आरएलडी, सीपीआयएम, सीपीआय, डीएमके, मुस्लिम लिग, एमआयएम, जनता दल, राष्ट्रवादी या पक्षांसह १८ पक्षांचे नेते उपस्थित होते.
Opposition parties name Gopal Krishna Gandhi as their candidate for the post of vice-president. pic.twitter.com/4O5AWt7smu — ANI (@ANI_news) July 11, 2017
गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू असून ते निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपालपद (२००४ ते २००९) भूषवलेले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज