नवी दिल्ली:
आगामी लोकसभा निवडणुकांआधी जानेवारीत मोदी सरकार विविध विकास कामे आणि यशस्वी योजनांची आकडेवारी देशवासियांसमोर ठेवणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरी भागातील स्मार्ट सिटी, हाऊसिंग फॉर ऑल, अमृत (AMRUT), स्वच्छ भारत आणि HRIDAY या विकास योजनांतर्गत होणाऱ्या कामांची माहिती जिओटॅग करून खास तयार केलेल्या एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजना आणि कार्यवाहीबाबतची माहिती मिळणार आहे. नगरविकास मंत्रालयाच्या सर्वाधिक योजना आहेत आणि हेच मंत्रालय अॅपदेखील तयार करणार आहे. या अॅपवर जानेवारी २०१९ पासून सर्व माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्व योजना आणि विकासकामांना जिओटॅग केल्यानंतर त्याचे व्हिडिओ, फोटो आणि पत्ते अॅपवर अपलोड केले जाणार आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकांआधी जानेवारीत मोदी सरकार विविध विकास कामे आणि यशस्वी योजनांची आकडेवारी देशवासियांसमोर ठेवणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरी भागातील स्मार्ट सिटी, हाऊसिंग फॉर ऑल, अमृत (AMRUT), स्वच्छ भारत आणि HRIDAY या विकास योजनांतर्गत होणाऱ्या कामांची माहिती जिओटॅग करून खास तयार केलेल्या एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.