अ‍ॅपशहर

एअर मार्शल भदौरीया होणार हवाई दल प्रमुख

एअर व्हाइस चीफ एअर मार्शल आरकेएस भदौरिया हे पुढील हवाई दल प्रमुख होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी भदौरिया यांची सरकारकडून निवड करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2019, 6:08 pm
नवी दिल्लीः एअर व्हाइस चीफ एअर मार्शल आरकेएस भदौरिया हे पुढील हवाई दल प्रमुख होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी भदौरिया यांची सरकारकडून निवड करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhadotiya


एअर व्हाइस चीफ एअर मार्शल आरकेएस भदौरिया हे भारतीय वायुदलातील सर्वोत्कृष्ट पायलटांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत २७ हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे लढाऊ तसेच परिवहन विमानांचे उड्डाण केले आहे. यात राफेलचाही समावेश आहे. एअर मार्शल भदौरिया यांनी मे महिन्यात व्हाइस चीफचा पदभार स्वीकारला होता. भदौरिया हे एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. ते १५ जून १९८० रोजी वायुदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाले होते.

भदौरिया हे प्रयोगिक टेस्ट पायलटसोबतच 'कॅट ए' गटातील क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि पायलट अटॅक इंस्ट्रक्टर सुद्धा आहेत. त्यांनी सेवेत वेगवेगळ्या बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा वायु सेना पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज