अ‍ॅपशहर

‘विद्यापीठांची नावे बदलणार नाही’

बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (बीएचयू) व अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) या विद्यापीठांचे नाव बदलण्याचा विचार नसल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.

Maharashtra Times 10 Oct 2017, 3:00 am
नवी दिल्ली : विद्यापीठांच्या नावांमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे शब्द असल्यामुळे विद्यापीठांची धर्मनिरपेक्षता दिसत नाही. त्यामुळे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (बीएचयू) व अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) या विद्यापीठांच्या नावांमधून हिंदू व मुस्लिम हे शब्द वगळावेत, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समितीने केली आहे. दरम्यान, या दोन्ही विद्यापीठांचे नाव बदलण्याचा विचार नसल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम govt has no plans to alter names of amu bhu says union minister prakash javadekar
‘विद्यापीठांची नावे बदलणार नाही’


दहा केंद्रीय विद्यापीठांमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी यूजीसीने ही समिती नेमली आहे. या समितीने ‘एएमयू’च्या लेखा परीक्षा अहवालामध्ये वरील शिफारशी केल्या आहेत. विद्यापीठे धर्मनिरपेक्ष शिक्षणसंस्था आहेत, मात्र विद्यापीठांच्या नावांमध्ये हिंदू व मुस्लिम हे धर्माशी निगडित शब्द असल्याने धर्मनिरपेक्षता दिसून येत नाही, असे या समितीतील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या विद्यापीठांची नावे बनारस युनिव्हर्सिटी व अलिगड युनिव्हर्सिटी अशी असावीत, असेही समितीने सुचविले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज