अ‍ॅपशहर

१ हजारपेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या ७ जागा

भाजपने कशीबशी ९९ जागांपर्यंत मजल मारून गुजरातची सत्ता राखण्यात यश मिळवलं असलं तरी या निकालांनी भाजपच्या काळजाचा ठोका मात्र चुकवला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसने भाजपला तगडे आव्हान देत अक्षरश: घाम फोडला. त्यामुळेच अनेक मतदारसंघात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली.

Ketki Angre | Ahmedabad Mirror 20 Dec 2017, 10:46 am
अहमदाबाद :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gujarat assembly election 2017 results in these 7 seats the victory margin is less than 1000 votes
१ हजारपेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या ७ जागा


भाजपने कशीबशी ९९ जागांपर्यंत मजल मारून गुजरातची सत्ता राखण्यात यश मिळवलं असलं तरी या निकालांनी भाजपच्या काळजाचा ठोका मात्र चुकवला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसने भाजपला तगडे आव्हान देत अक्षरश: घाम फोडला. त्यामुळेच अनेक मतदारसंघात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ७ मतदारसंघात विजयी उमेदवारांचं मताधिक्य १ हजारापेक्षाही कमी आहे. यातील गोध्रा व अन्य दोन जागा भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत तर चार जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.

या मतदारसंघांत १ हजारपेक्षा कमी मतांनी विजय...

कपराडा: काँग्रेसचे जितूभाई चौधरी यांनी अवघ्या १७० मतांनी भाजपचे मधुभाई राऊत यांचा पराभव केला. गेल्या निवडणुकीत जितूभाई याच मतदारसंघातून १८ हजार मतांनी विजयी झाले होते.

गोध्रा: गेल्यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढून विजयी झालेले सी. के. राऊलजी यांनी पक्षांतर केलं आणि यावेळी भाजपकडून निवडणूक लढवली. राऊलजी यांनी अवघ्या २५८ मतांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्रसिंह परमार यांचा पराभव केला.

ढोलका: भाजपचे भूपेंद्रसिंह मनुभा यांनी काँग्रेसचे अश्विनभाई राठोड यांना अवघ्या ३२७ मतांनी पराभूत केले.

मानसा: काँग्रेसचे उमेदवार सुरेशकुमार पटेल यांनी भाजपचे अमितभाई चौधरी यांचा ५२४ मतांनी पराभव करत विजय मिळवला.

डांग: काँग्रेसचे विजयी उमेदवार मंगलभाई गावित यांना भाजपचे पराभूत उमेदवार विजयभाई पटेल यांच्यापेक्षा अवघी ७६८ मते अधिक मिळाली.

बोटाद: सर्व निकाल जाहीर झाले तरी भाजपचे सौरभ पटेल यांना विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यांनी ९०६ मतांनी काँग्रेसचे धीरजलाल कलाठिया यांचा पराभव केला.

दियोदर: काँग्रेसचे शिवभाई भुरिया यांनी भाजपचे केशाजी चौहान यांचा फक्त ९७२ मतांनी पराभव केला.

ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा
लेखकाबद्दल
Ketki Angre

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज