अ‍ॅपशहर

मंत्र्यांच्या झिंगलेल्या मुलाचे 'विमान जमिनीवर'!

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाला, जयमीन पटेल यांना दारु पिऊन विमानात चढल्यामुळे विमानातून उतरवण्यात आले. कतार एअरवेजच्या फ्लाइटने ते सहकुटुंब ग्रीसला निघाले होते. पण झिंगलेल्या अवस्थेत त्यांना चालताही येत नव्हते, विमान कर्मचाऱ्यांशी त्यांनी वादही घातला. परिणामी पटेल यांचे 'विमान' कतार एअरवेजने जमिनीवर आणले!

Maharashtra Times 10 May 2017, 12:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gujarat deputy cms son found heavily drunk taken off qatar airways flight
मंत्र्यांच्या झिंगलेल्या मुलाचे 'विमान जमिनीवर'!


गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाला, जयमीन पटेल यांना दारु पिऊन विमानात चढल्यामुळे विमानातून उतरवण्यात आले. कतार एअरवेजच्या फ्लाइटने ते सहकुटुंब ग्रीसला निघाले होते. पण झिंगलेल्या अवस्थेत त्यांना चालताही येत नव्हते, विमान कर्मचाऱ्यांशी त्यांनी वादही घातला. परिणामी पटेल यांचे 'विमान' कतार एअरवेजने जमिनीवर आणले!

जयमीन पटेल, त्यांची पत्नी झलक आणि मुलगी वैश्वी कतार एअरवेजच्या पहाटेच्या ४ च्या विमानाने निघणार होते. त्यासाठी ते अहमदाबाद आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोहोचले. पण जयमीन हे दारू पिऊन झिंगलेल्या अवस्थेत होते. इमिग्रेशन आणि अन्य चेक इन प्रक्रिया त्यांनी व्हीलचेअरवरून केली, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी आयएएनएसला दिली. 'जयमीन यांना उड्डाण करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांची कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांशी शाब्दिक चकमकही झाली,' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज