अ‍ॅपशहर

गुजरातेत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राडा!

भाजपला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राडा सुरू झाला आहे. पक्षाने रविवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केल्यानंतर नाराज इच्छुकांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी विरोध केला. तर गांधीनगरमध्ये काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली.

Maharashtra Times 27 Nov 2017, 11:15 am
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gujarat elections third list released by congress fierce ruckus in many places
गुजरातेत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राडा!

भाजपला पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राडा सुरू झाला आहे. पक्षाने रविवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केल्यानंतर नाराज इच्छुकांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी विरोध केला. तर गांधीनगरमध्ये काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात तोडफोड केली.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. काँग्रेस पक्षाने रविवारी ७६ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, इच्छुक असलेल्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांच्या समर्थकांनी बनासकांठा आणि राज्यातील अन्य जिल्ह्यांत जोरदार विरोध केला. वेजलापूर, दीसा, राधनपूर, अकोटा, वघोडिया आदी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या समर्थकांनी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गांधीनगरमधील पक्षाच्या कार्यालयातही तोडफोड केली. या नाराजीचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे, असे जाणकार सांगतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज