अ‍ॅपशहर

प्रकाशपर्व : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली

Guru Gobind Singh Jayanti 2021 : शिखांचे दहावे गुरु - गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आदरांजली व्यक्त केलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2021, 12:00 pm
नवी दिल्ली : शिखांचे दहावे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोशल मीडियावरून आदरांजली व्यक्त केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली


'प्रकाशपर्वाच्या पवित्र निमित्तानं मी श्री गुरु गोविंद सिंह यांना नमन करतो. गुरु गोविंद सिंह यांचं आयुष्य न्यायसंगत आणि समावेशक समाज निर्माणासाठी समर्पित होतं. आपल्या तत्वांवर ते अढळ राहिले. त्यांचं साहस आणि बलिदान नेहमीच आमच्या आठवणीत राहील' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.


गुरु गोविंद सिंह यांची आपल्यावर विशेष कृपा राहिली कारण त्यांच्या ३५० वं प्रकाशपर्व साजरं करण्याची संधी आपल्या कार्यकाळात आपल्याला मिळाली, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

२०१७ साली पाटणा साहेबमध्ये आयोजित करण्यात आलेला सोहळ्याची आठवण करत तिथेही गुरुंना श्रद्धांजली देण्याची संधी आपल्याला मिळाली, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.


गुरु गोविंद सिंह यांचा जन्म पाटण्यात आजच्याच दिवशी झाला होता. त्यांची जयंती प्रकाशपर्वाच्या रुपात साजरी केली जाते. शिखांचे दहावे गुरु असणारे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांना 'केश, कडा, कृपाण, कंघा आणि कच्छा' अशा पाच वस्तू अनिवार्य केल्या होत्या. याशिवाय खालसा वेश पूर्ण मानला जात नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज