अ‍ॅपशहर

काश्मिरातील हिंसाचारामागे हाफीज सईदच

दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शनांच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईद आणि त्याची संघटना हिजबुल मुजाहिदीनचा असल्याचे समोर आलं आहे. खुद्द हाफीज सईद यानंच तशी जाहीर कबुली दिली आहे.

Maharashtra Times 23 Jul 2016, 1:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । गुजरांवाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hafiz sayeed instigating voilence in kashmir
काश्मिरातील हिंसाचारामागे हाफीज सईदच


दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शनांच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईद आणि त्याची संघटना हिजबुल मुजाहिदीनचा असल्याचे समोर आलं आहे. खुद्द हाफीज सईद यानंच तशी जाहीर कबुली दिली आहे.

हाफीज हा 'दुख्तारन-ए-मिल्लत' या काश्मीरमधील बंडखोर विचारांच्या संघटनेच्या संपर्कात आहे. त्याने दुख्तारन-ए-मिल्लतची नेता आसिया अंद्राबी हिच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी हाफीजनं जम्मू-काश्मीरमध्ये संरक्षण दलाविरोधात चिथावणी देण्यासाठी हरतऱ्हेची मदत देण्याचे आश्वासन दिले. आसिया व हाफीजमधील संभाषणाची माहिती त्यानंच पाकिस्तानमधील गुजरांवाला येथे झालेल्या 'काश्मीर कारवाँ' रॅलीत दिली. आसियाला मी बहिणीसमान मानतो आणि बहिणीची मदत करण्यासाठी नेहमीच तप्तर आहे, असंही तो म्हणाला. बुरहान वानी याच्याशीही मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो, असंही त्यानं सांगितलं. वानीला मारणाऱ्या सुरक्षा दलाविरोधात होत असलेल्या प्रत्येक कारवाईला मदत देण्याची घोषणाही त्यानं केली.

पाकिस्तान सरकारच्या परवानगीने झालेल्या 'काश्मीर कारवाँ' रॅलीत हाफीजनं जाहीरपणे भारतात हिंसक कारवाया करण्याची घोषणा केली. भारतानं जम्मू-काश्मीरमधून सैन्य मागे घ्यावं नाही तर आम्ही या सैन्याला मागे ढकलू,' असं तो म्हणाला. याआधी १९ जुलै रोजी हाफीजनं पाकिस्तानमध्ये 'ब्लॅक डे'चं आयोजन केलं होतं. 'ब्लॅक डे'चं घोषित करून त्यानं भारतीय सैनिकांचा निषेध केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज