अ‍ॅपशहर

तुटलेल्या हाताने केला मायलेकींचा बनाव उघड!

येथे मंगळवारी आई-मुलीची एक अजब केस पोलिसांकडे आली. मायलेकी शौचालयाला गेल्या असताना मुलीवर बलात्कारचा प्रयत्न करताना नराधमाने तिचा हात कापून टाकला होता. पण घटनास्थळी पोलिसांना मुलीचा तुटलेला हात सापडला नाही, त्यामुळे दोघींच्या बोलण्यावर संशय आला. खोलात शिरून चौकशी केल्यावर कळले की दोघी शौचासाठी रेल्वे रुळांवर बसल्या होत्या आणि ट्रेन आली. अपघातात लेकीचा एक हात तुटला, पण नुकसानभरपाईसाठी दोघींनी बलात्काराचा बनाव रचला.

Maharashtra Times 27 Oct 2016, 12:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । आग्रा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hand chopped incident was a conspiracy for compensation
तुटलेल्या हाताने केला मायलेकींचा बनाव उघड!


येथे मंगळवारी आई-मुलीची एक अजब केस पोलिसांकडे आली. मायलेकी शौचालयाला गेल्या असताना मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना नराधमाने तिचा हात कापून टाकला होता. पण घटनास्थळी पोलिसांना मुलीचा तुटलेला हात सापडला नाही, त्यामुळे दोघींच्या बोलण्यावर संशय आला. खोलात शिरून चौकशी केल्यावर कळले की दोघी शौचासाठी रेल्वे रुळांवर बसल्या होत्या आणि ट्रेन आली. अपघातात लेकीचा एक हात तुटला, पण नुकसानभरपाईसाठी दोघींनी बलात्काराचा बनाव रचला.

दलित मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नात मुलीचा हात तोडून टाकला, अशी बातमी बुधवारी एका वाहिनीवर चालवली गेली. पोलिसही या प्रकाराने अचंबित होते. पोलिसांना या मायलेकींनी सांगितलेल्या कहाणीनुसार, दोघी रेल्वे ट्रॅकच्या दिशेने शौचासाठी जात होत्या. तितक्यात बाइकवरून आलेल्या गुंडांनी त्यांना घेरले. मुलीला ते झुडुपात घेऊन गेले. तिने आरडाओरडा केल्यामुळे गुंडांनी तिचा हात तोडला, रक्ताच्या थारोळ्यातल्या मुलीला परिचितांनी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना घटनास्थळी खूप रक्त सांडलेले दिसले. पण गुंडांनी तिचा हात का कापला हा प्रश्न पोलिसांना पडला होता. शिवाय घटनास्थळी तुटलेला हात नव्हता. ते गुंड तिचा हात सोबत का घेऊन गेले, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांना सापडत नव्हते. सखोल चौकशी करता सत्य बाहेर आले. दोघींना कुणीतरी सांगितले होते की बलात्काराचा बनाव रचला तर भरपूर नुकसानभरपाई मिळेल. त्यानुसार दोघींनी खोटी कहाणी रचली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज