अ‍ॅपशहर

मोदींनी 'इंडिया'ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोड्सची मुलगी 'इंडिया' हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाँटी रोड्सची चिमुकली २ वर्षांची झाली आहे. मोदींनी 'हॅपी बर्थ डे टू इंडिया, फ्रॉम इंडिया', अशा शब्दांत मोदींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra Times 24 Apr 2017, 2:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happy birthday india from india pm modi wishes jonty rhodes daughter
मोदींनी 'इंडिया'ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोड्सची मुलगी 'इंडिया' हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाँटी रोड्सची चिमुकली २ वर्षांची झाली आहे. मोदींनी 'हॅपी बर्थ डे टू इंडिया, फ्रॉम इंडिया', असं ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy birthday to India, from India. :) https://t.co/DbOZFEKLe9 — Narendra Modi (@narendramodi) April 23, 2017 जाँटीनं स्वत:ही मुलीसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 'हॅप्पी बर्थ डे बेबी इंडिया' असं ट्विटही त्यानं केलं आहे. जाँटी सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सहयोगी स्टाफचा भाग आहे. २०१५ मध्ये जाँटी आयपीएलसाठी भारत दौऱ्यावर असताना त्याला मुलगी झाली होती. विविधतेनं नटलेल्या भारतीय संस्कृतीनं भारावलेल्या जाँटीनं भारताच्या प्रेमाखातर मुलीचं नाव 'इंडिया' असं ठेवलं आहे.
Happy Birthday baby India; 2 today #landofyourbirth pic.twitter.com/RGVxmXRjRv — Jonty Rhodes (@JontyRhodes8) April 23, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज