अ‍ॅपशहर

हर्षवर्धन श्रिंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव

भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रिंगला देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्विकारतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 9:23 pm
नवी दिल्ली: भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रिंगला देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्विकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Harshavardhan-shringla


हर्षवर्धन श्रिंगला हे १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या ३५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याशिवाय हर्षवर्धन यांनी बांगलादेश व थायलंड या देशांमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याशिवाय व्हिएतनाम, इस्राएल आणि दक्षिण आफ्रिका या देशातही त्यांनी भारताच्यावतीने महत्त्वाची पदांवरील जबाबदारी पार पाडली. सध्या हर्षवर्धन श्रिंगला हे अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज