अ‍ॅपशहर

रामरहीमविरोधातील खून खटल्याची आज सुनावणी

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंह विरोधात सुरू असलेल्या दोन खून खटल्यातील सुनावणी आज सीबीआयच्या कोर्टात होणार आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामरहीम सध्या रोहतक जेलमध्ये बंदीस्त आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 8:58 am
मटा ऑनलाइन वृत्त । पंचकुला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hearing today in 2 murder cases against dera chief security tightened in panchkula
रामरहीमविरोधातील खून खटल्याची आज सुनावणी

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंह विरोधात सुरू असलेल्या दोन खून खटल्यातील सुनावणी आज सीबीआयच्या कोर्टात होणार आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामरहीम सध्या रोहतक जेलमध्ये बंदीस्त आहे.

डेऱ्यात साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली रामरहीमला २० वर्षाची शिक्षा कोर्टाने याआधीच ठोठावली आहे. रामरहीम रोहतक जेलमध्ये कैदेत असून तेथूनच तो व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर होणार आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि माजी डेरा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टात आज सुनावणी होणार आहे. जर यात रामरहीम दोषी आढळला तर त्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.

२४ ऑक्टोबर २००२ रोजी सिरसामधील सांयदैनिक 'पुरा सच'चे संपादक रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या केली होती. गंभीर जखमी झालेल्या छत्रपती यांचा २१ नोव्हेंबर २००२ रोजी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. छत्रपती यांनी आपल्या वृत्तपत्रात डेरामध्ये साध्वींवर होत असलेल्या लैंगिक शोषणासंबंधीचं पत्र छापलं होतं. तसेच डेरा प्रबंध समितीचे सदस्य राहिलेले रणजीत सिंह यांची १० जुलै २००२ रोजी हत्या करण्यात आली होती. रणजीत सिंह यांनी साध्वीचं पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्याचा रामरहीमला संशय होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज