अ‍ॅपशहर

मुसळधार पावसामुळं राजधानी दिल्ली ठप्प

मुसळधार पावसामुळं आज राजधानी दिल्ली ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली आहे. रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. घराबाहेर पडणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

Maharashtra Times 31 Aug 2016, 11:18 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rain lashes delhi ncr and hyderabad
मुसळधार पावसामुळं राजधानी दिल्ली ठप्प


मुसळधार पावसामुळं आज राजधानी दिल्ली ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली आहे. रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. घराबाहेर पडणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. हवामान विभागानुसार, बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दिल्लीत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. वाहतूककोंडी झाली असून, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिवसभर उत्तर-पश्चिम, दक्षिण-दक्षिण-पूर्व, एनसीआरसह दिल्ली, भिवानी, रोहतक, आयजीआय एअरपोर्ट, द्वारका, आर. के. पुरम, गुडगाव, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे.





दिल्लीत सुरु असलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, रिंग रोड, भैरव रोड-मथुरा रोड, इग्नू रोड, आयपी उड्डाणपूल-सराय काले खाँ, बारापुला उड्डाणपूल ते डीएनडी, रिंग रोड महाराणी बाग, लाजपत नगर, राजा गार्डन, जिमखाना-त्रिमूर्ती मार्ग येथे पाणी साचल्यानं प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. दरम्यान, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. २४ विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज