अ‍ॅपशहर

करोनाच्या पार्श्वभूमीवर.... शेकडो बगळ्यांचा रहस्यमय मृत्यू!

करोना विषाणूमुळे देश धास्तावलाय. या विषाणूमुळे आत्तापर्यंत १७२ रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश इथं शेकडो पक्ष्यांचा रहस्यमय मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2020, 4:50 pm
अलीगड, उत्तर प्रदेश : देशभर करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असतानाच उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात अचानक शेकडो बगळ्यांचा संदिग्ध मृत्यू झाल्याचं समोर येतंय. अलीगडच्या भुजपुरा भागात ही घटना घडलीय. बगळ्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन अधिकारी इथे दाखल होत झाले. मृत बगळ्यांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बगळ्यांचा रहस्यमय मृत्यू


वाचा : करोनाला पळवण्यासाठी ट्रॅफिक पोलिस गातो गाणे

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी भुजपुरा भागात एकाच ठिकाणी डझनभर बगळे मृत पाहून पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी १०० हून अधिक मृत बगळे ताब्यात घेऊन त्यांना जमिनीत दफन केलं. त्यांचे सॅम्पल्स चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.

जिल्हा वन अधिकारी सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बेशुद्धावस्थेत सापडलेल्या बगळ्यालाही ताब्यात घेण्यात आलं. चाचणी अहवाल आल्यानंतरच या बगळ्यांच्या अचानक मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. ज्या ठिकाणी हे मृत बगळे सापडले आहेत त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

वाचा : करोना नाही, गोव्यात हनीमून प्रेमींची हवा

महाराष्ट्रात सापडले मृत कावळे

दरम्यान, महाराष्ट्रात अमरावतीमध्येही अशीच घडना घडलेली दिसतेय. अमरावती लगतच्या भानखेडा या गावात अज्ञात आजाराने कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचं निदर्शनास आलंय. आत्तापर्यंत जवळपास ३० मृत कावळे सापडल्यानंतर गावकरीही चिंतीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अमरावतीमध्ये अद्याप एकही करोना रुग्ण आढळलेला नाही.

वाचा : देशात अजून करोनाचा सामुदायिक संसर्ग नाही!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज