अ‍ॅपशहर

कैरानानंतर अलीगडमधूनही हिंदूंचे स्थलांतर

उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील दहा कुटुंबांनी आपली मालमत्ता विकून स्थलांतर करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. जिल्ह्यात हिंदू महिलांची छेड काढण्याचे; तसेच हिंदू कुटुंबांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचे प्रकार वाढल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे या कुटुंबांचे म्हणणे आहे.

Maharashtra Times 25 Jul 2016, 9:09 am
वृत्तसंस्था, लखनौ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu familys wants to leave aligarh
कैरानानंतर अलीगडमधूनही हिंदूंचे स्थलांतर


उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील दहा कुटुंबांनी आपली मालमत्ता विकून स्थलांतर करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. जिल्ह्यात हिंदू महिलांची छेड काढण्याचे; तसेच हिंदू कुटुंबांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचे प्रकार वाढल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे या कुटुंबांचे म्हणणे आहे. अलीगडच्या महापौर शकुंतला भारती या दहा कुटुंबांच्या प्रमुखांसोबत न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज देण्यासाठी गेल्या होत्या. श्यामली जिल्ह्यातील कैराना येथे झालेल्या हिंदूंच्या स्थलांतरानंतर अलीगडमध्येही हा प्रकार सुरू झाला आहे.

अलीगडमधील बाबरी मंडी भागात गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून हिंदू कुटुंबांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या बुधवारी एका नवविवाहित दाम्पत्यातील महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. त्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिचे कुटुंबीय घराबाहेर आले आणि त्यांनी समाजकंटकांना पळवून लावले. त्यानंतर या चौघांविरुद्ध पोलिसांत ‘एफआयआर’ दाखल केला. पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. याबाबत महापौर भारती म्हणाल्या, ‘दिवसाआड हिंदू महिलांची छेड काढण्याचे आणि त्यांचा छळ करण्याचे प्रकार होत आहेत. पोलिस त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींवर बघ्याची भूमिका घेत असल्याने या विशिष्ट समाजातील मूलतत्त्ववाद्यांचे धारिष्ट्य वाढत आहे.’

‘राज्य सरकार अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करत असल्याने या भागात राहणाऱ्या बहुसंख्य समाजावर स्थलांतराचे संकट ओढवले आहे,’ असा आरोपही भारती यांनी केला. दरम्यान, न्यायदंडाधिकारी अवधेश तिवारी म्हणाले, ‘या कुटुंबांनी स्थलांतर करू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्व आवश्यक कार्यवाही करेल. बुधवारी झालेल्या घटनेबद्दल केलेल्या तक्रारीबाबत लवकरच कारवाई केली जाईल.’ ‘संबंधित हिंदू कुटुंबाला आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल,’ असे आश्वासनही तिवारी यांनी दिले.

बाबरी मंडीतील गुंडगिरी

बाबरी मंडी भागात दररोज गुंडगिरी, छेड काढणे, मारहाण करणे, घरे लुटणे असे प्रकार सुरू आहेत. यामुळे येथील हिंदू कुटुंबे जीव मुठीत धरून जगत आहेत. हिंदू कुटुंबे तुलनेने कमी असल्यामुळे हिंदू महिलांना जगणे मुश्कील होऊन बसले आहे. गेल्या दहा वर्षांत येथील ५० व्यक्तींनी या भागातून स्थलांतर केले आहे. गेल्या दोन वर्षांत दोन कुटुंबांनी येथील मालमत्ता विकून सासनी गेट या भागात ती स्थलांतरित झाली आहेत. अन्य ६० कुटुंबेही असुरक्षित वातावरणामुळे हा भाग सोडण्याच्या तयारीत आहेत.

मुलींना त्रास

सुधा नावाच्या स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ‘आमच्या परिसरातील मुली शाळेत जाण्यास नकार देतात. शाळेच्या वाटेवरील अरुंद गल्ल्यांमध्ये विशिष्ट धर्माच्या मुलांकडून शाळकरी मुलींना त्रास दिला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुहाने उभे असलेले गावगुंड आमच्या मुलींची छेड काढतात. शहरात फिरणे सुरक्षित राहिलेले नाही.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज