अ‍ॅपशहर

'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत'

'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत म्हणूनच हिंदूंची लोकसंख्या घटत चालली आहे', असं विधान आज केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटत आहे, असेही रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Maharashtra Times 13 Feb 2017, 7:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu population is reducing in india because hindus never convert people kiren rijiju
'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत'


'हिंदू कधीच लोकांचं धर्मांतर करत नाहीत म्हणूनच हिंदूंची लोकसंख्या घटत चालली आहे', असं विधान आज केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटत आहे, असेही रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

अरुणाचल प्रदेशला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हिंदू राज्य बनवू पाहत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला उत्तर देताना रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 'भारत हा एक धर्ननिरपेक्ष देश आहे. येथे सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते शांततापूर्ण मार्गाने राहत आहेत. अशावेळी काँग्रेस अशाप्रकारची बेजबाबदार आणि प्रक्षोभक विधानं का करत आहे?, असा सवाल रिजिजू यांनी केला.


Hindu population is reducing in India because Hindus never convert people. Minorities in India are flourishing unlike some countries around. pic.twitter.com/W4rZnk1saM — Kiren Rijiju (@KirenRijiju) February 13, 2017
दरम्यान, रिजिजू यांनी केलेल्या ट्विटवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. रिजिजू हे केवळ हिंदूंचे नाहीत तर पूर्ण भारताचे मंत्री आहेत. त्यांनी देशाचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे, याचं भान ठेवावं, असे ओवेसी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज