अ‍ॅपशहर

हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना जागाच नाही असे नव्हे : भागवत

हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांसाठी जागाच नसेल असे नव्हे. हिंदू राष्ट्र ही सर्व धर्मसमावेशक संकल्पना आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. दिल्लीत एका व्याख्यानात ते बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2018, 10:54 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagvat


हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांसाठी जागाच नसेल असे नव्हे. हिंदू राष्ट्र ही सर्व धर्मसमावेशक संकल्पना आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. दिल्लीत एका व्याख्यानात ते बोलत होते.

संघ जागतिक बंधुभावाच्या संकल्पनेसाठी कार्यरत आहे आणि या बंधुभावाच्या संकल्पनेत विविधतेतून एकता अभिप्रेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तत्वज्ञान हे प्रत्येकाला सोबत घेऊन जातं. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना स्थानच नाही असं नाही. ज्या दिवशी असं म्हटलं जाईल त्या दिवशी हिंदुत्व संपेल. हिंदुत्व वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेबद्दल बोलतो, असे ते म्हणाले.

हिंदुत्व हे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचं सार आहे आणि विविध धर्म, विचारांच्या लोकांमध्ये बंधुभाव रुजवणं त्याचं उद्दिष्ट आहे, असं भागवत म्हणाले. तीन दिवसीय व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानात ते बोलत होते.

'हिंदुत्व ही संकल्पना भारतीयत्वच्या संकल्पनेशी समानता साधणारी आहे. ज्या सर्व भारतीय अभिप्रेत आहेत. ती विविधतेतून एकतेचं प्रतिक आहे. संघदेखील याच भारतीयत्वाच्या संकल्पनेत विश्वास ठेवतो,' असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज