अ‍ॅपशहर

ड्युटीवरील जवानांवर 'सोशल मीडिया बंदी'

जवानांच्या तक्रारींसाठी लष्करी तळ व कार्यालयांमध्ये तक्रारपेट्या ठेवल्या जातील, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जाहीर केले असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वावराला लगाम घातला आहे.

Maharashtra Times 14 Jan 2017, 10:52 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम home ministry releases guidelines for paramilitary forces regarding social media use
ड्युटीवरील जवानांवर 'सोशल मीडिया बंदी'


जवानांच्या तक्रारींसाठी लष्करी तळ व कार्यालयांमध्ये तक्रारपेट्या ठेवल्या जातील, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जाहीर केले असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वावराला लगाम घातला आहे. ड्युटीवर असताना एखाद्या जवानाला ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम वा यूट्यूब आदि सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्याला आधी संबंधित दलाच्या महासंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. खासगी मेसेज पाठवण्यावर मात्र कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल.

'द टेलिग्राफ'ने याबाबत वृत्त दिलं आहे. सातही निमलष्करी दलांच्या महासंचालकांना या ताज्या आदेशाची प्रत रवाना करण्यात आली आहे व या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, असे बजावण्यात आले आहे, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. यामुळे एखाद्या जवानाने यापुढे अंतर्गत बाबींवर मतप्रदर्शन केलं तर त्याला ते चांगलेच महागात पडणार आहे.

दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लष्करातील शिस्त अबाधित राहावी म्हणून अशाप्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आल्याचे सांगितले. जवानांच्या समस्या सोडवण्यास आमचं सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज