नोएडा : नोएडामधील मेट्रो रुग्णालय आणि हृदयरोग संस्थेच्या बहुमजली इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागली तेव्हा रुग्णालयात साठहून अधिक लोक होते. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. रुग्णालयातील ४०हून अधिक रुग्णांना मेट्रो रुग्णालयाच्या अन्य शाखेत हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या १० बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
रुग्णालयाला आग
नोएडामधील मेट्रो रुग्णालय आणि हृदयरोग संस्थेच्या बहुमजली इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही...
30 8 Feb 2019, 4:00 am