अ‍ॅपशहर

omicron : किती धोकादायक आहे करोना विषाणूचा नवा प्रकार 'ओमिक्रॉन', जाणून घ्या ...

करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने अनेक देशांनी तातडीने खबरदारीची पावलं उचलत नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध आणले आहेत. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनेही सतर्कतेचा इशारा आहे. यामुळे करोना विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घेऊया करोना विषाणूच्या या नव्या प्रकाराबद्दल....

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2021, 2:59 pm
नवी दिल्लीः करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला Omicron असे नाव देण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने करोनाच्या या नव्या विषाणूवरून धोक्याचा इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत या आठवड्यात प्रथमच करोनाचा नवीन समोर आला. त्यानंतर हा प्रकार बोस्टवानासह जवळपासच्या इतर अनेक देशांमध्ये पसरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how dangerous is new variant of covid omicron
किती धोकादायक आहे करोनाचा नवीन विषाणू 'ओमिक्रन', जाणून घ्या ...


किती धोकादायक आहे ओमिक्रॉन?

करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन हा नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे म्हणत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू आहे. हा विषाणू खूपच धोकादायक आहे आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने करोना लसीच्या दोन्ही डोससह तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता. करोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारांपेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे.

करोनाचा हा नवीन विषाणू Omicron कसा आहे?

ओमिक्रॉनमध्ये अनेक स्पाइक प्रोटीन म्युटेश (बदल) आहेत आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे. ओमिक्रॉन हा ग्रीक शब्द आहे. कोविड-19 महामारीच्या आगमनानंतर त्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शास्त्रज्ञही करोनाच्या विविध प्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. यानुसार दक्षिण आफ्रिकेत जिनोमिक्सचे निरीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने अलिकडेच एक नवीन प्रकार शोधून काढला आणि त्याला B.1.1.529 असे नाव दिले. याला जागतिक आरोग्य संघटनेने 'ओमिक्रॉन' असे नाव दिले आहे.

new covid variant : करोनाच्या नव्या वेरियंटने जगात टेन्शन, PM मोदींनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

करोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षाही अधिक धोकादायक आहे Omicron

करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर चिंता वाढली आहे. या नव्या प्रकारावरून नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. करोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हा अधिक अत्यंत संसर्गजन्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवर वेगाने मात करण्यात कार्यक्षम आहे, असे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाचे म्हणणे आहे. कारण बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

international flights : मोठा निर्णय! नवीन वर्ष, नाताळची सुट्टी विदेशात साजरी करणाऱ्यांसाठी खूशखबर

करोनाच्या नव्या विषाणूचा म्हणजे ओमिक्रॉनचा संसर्ग दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरत आहे. यावर डॉक्टर आणि शास्त्रज्ञांची विशेष नजर असून विविध अभ्यास केले जात आहेत. बूस्टर डोसची आश्यकताही व्यक्त केली जात आहे. बूस्टर डोसमुळे लसीची परिणामकारकता लक्षणीयरित्या वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक देशांनी खबरदारी बाळगत प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

महत्वाचे लेख