अ‍ॅपशहर

hyderabad : हैदराबादच्या हुसेन सागरमध्ये आढळले करोनाचे जेनेटीक मटेरियल, अभ्यासातून उघड

हैदराबादमधील प्रसिद्ध हुसेन सागर तलावात करोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळून आले आहेत. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हुसेन सागर तलावासह आणखी दोन तलावांमध्ये करोनाचे जेनेटिक मटेरियल आढळले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2021, 1:54 am
हैदराबादः हैदराबादमधील हुसेन सागरसह ( hyderabad hussainsagar lake ) इतर काही तलावांमध्ये करोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळून आले आहे. एका अभ्यासातून हे समोर आलं ( hussainsagar lake infested with coronavirus ) आहे. पण याद्वारे संसर्ग पुढे वाढलेला नाही, असंही अभ्यासत स्पष्ट करण्यात आलं आहे. हुसेन सागर तलावाशिवाय नाचारममधील पेद्दा चेरवु आणि निजाम तलावातही करोना व्हायरसचे जेनेटीक मटेरियल आढळले आहे. तलावांच्या पाण्यात असेलेले करोनाचे हे जेनेटीक मटेरियअल या वर्षी फेब्रुवारीपासून वाढण्यास सुरू झाले आहे. तेव्हापासूनच देशात करोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hyderabad hussain sagar
हैदराबादच्या हुसेन सागरमध्ये आढळले करोनाचे जेनेटीक मटेरियल, अभ्यासातून उघड


काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि अकॅडमी ऑफ सायंटिफ्कि अँड इनोव्हेटिव रिसर्च या संस्थांनी मिळून हा अभ्यास केला आहे. ७ महिन्यांत केलेल्या अभ्यासात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास करण्यात आला आहे.

covid vaccine : 'भारतातील लसी करोनाच्या व्हेरियंटशी लढण्यात सक्षम, पण प्रभाव कमी होणार'

पाण्यात आढळून आलेल्या मटेरियलने पुढच्या लाटेचा अंदाज लावणं कठीण

शहरांमधून जे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्रदुषित पाणी वाहून आले आहे त्यातूनच करोना व्हायरचे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये पसरले आहे. पण या जेनेटिक मटेरियल ने पुढे प्रादुर्भाव वाढला नाही. पण देशात सुरू असलेली करोनाची दुसरी लाट आणि येणाऱ्या लाटेचा अंदाजाकरता अभ्यासासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

sputnik light vaccine : 'स्पुतनिक लाइट' ठरू शकते भारतातील पहिली एक डोस असलेली करोनावरील लस,

दुसऱ्या देशातही अभ्यास, पाण्यातून संसर्गाचे पुरावे नाहीत

जगातील इतर देशांमध्येही अनेक ठिकाणी अभ्यास सुरू आहे आणि करण्यात येत आहेत. यात पाण्यात व्हायरस आहे की नाही? याचा तपास करण्याच्या प्रयत्न केला गेला. पण पाण्यात आतापर्यंत जे जेनेटीक मटेरियल आढळले आहे तो व्हायरस नाहीए. यामुळे पाण्याद्वारे चेहरा आणि किंवा तोंडातून संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे, असं CCMB च्या संचालकांनी सांगितलं होतं.

महत्वाचे लेख