अ‍ॅपशहर

हैदराबाद बलात्कार प्रकरण: जया बच्चन म्हणाल्या, 'देर आए दुरुस्त आए'

काही दिवसांपूर्वी संसदेत या प्रकरणी बोलताना जया यांनी आरोपींना जमावाकडे सुपूर्द करण्यात यावं अशी मागणी केली होती. ​​​​जया यांच्या त्या विधानावर गदारोळही झाला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 12:32 pm
नवी दिल्ली- समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद सामुहिक बलात्काराच्या एन्काउंटरप्रकरणी 'देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी संसदेत या प्रकरणी बोलताना जया यांनी आरोपींना जमावाकडे सुपूर्द करण्यात यावं अशी मागणी केली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jaya-bachchan


जया यांच्या त्या विधानावर गदारोळही झाला होता. असं असताना उन्नाव आणि इतर बलात्काराच्या घटनांवर अशीच शिक्षा करण्यात यावी का या प्रश्नावर मात्र जया यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

जया म्हणाल्या की, 'बहुत देर हो गई, देर आए दुरुस्त आए'
जया यांनी एन्काउंटरवर अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर त्यांनी फक्त, 'देर आए दुरुस्त आए... बहुत देर हो गई... बहुत ज्यादा देर हो गई।' यानंतर पत्रकारांनी त्यांना उन्नाव सामुहिक बलात्काराच्या आरोपींसोबत असंच झालं पाहिजे का या प्रश्नावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


एन्काउंटरमध्ये मारले गेले दिशा बलात्कार प्रकरणाचे आरोपी-
२७ वर्षीय महिला डॉक्टरवर या चौघांनी अमानुष अत्याचार केले. दारू पिऊन असलेल्या या आरोपांनी महिला डॉक्टर आपली स्कूटी पार्क करत असल्याचे पाहिले आणि त्यांनी आपली योजना आखली. त्यांनी स्कूटीची हवा काढून टाकली आणि मदतीचा बहाणा करून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी बलाकार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली.

आरोपी इथवरच न थांबता त्यांनी तिचे शव ट्रकमध्ये लादून टोलनाक्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावरून ते खाली फेकून दिले. पहाटे दूधवाल्याने शव पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला.

हैदराबादचे पोलीस कमिश्नर वी.सी. सज्जनार यांनी सांगितले की, आरोपींना घटनास्थळी केलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान झाली.

जया बच्चन यांनी केली होती मॉब लिंचिंगची मागणी-
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांना या घटनेची एवढी चीड होती की त्यांनी संसदेत आरोपींचं मॉब लिंचिंग करण्यात यावं अशी मागणी केली होती. जया यांच्या या वक्तव्याचा अनेकांना धक्का बसला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज