अ‍ॅपशहर

यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढत नाहीत! चिंताग्रस्त तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

hyderabad youtuber ends life: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यानं एका २३ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. हा तरुण आयआयआयटीटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकत होता. रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं जीवन संपवलं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2022, 5:13 pm
हैदराबाद: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यानं एका २३ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. हा तरुण आयआयआयटीटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकत होता. एका रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं जीवन संपवलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth suicide
तरुणाची आत्महत्या


यूट्यूब चॅनलची प्रेक्षक संख्या कमी होत असल्यानं आणि आई-वडील करिअरसंबंधी सल्ले देत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं तरुणानं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं. सायद्राबादचे पोलीस निरीक्षक सुब्बा रामी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरुण आयआयआयटीटीएम ग्वाल्हेरमध्ये चौथ्या वर्षात शिकत होता. एका तीन मजली इमारतीवरून उडी घेत त्यानं आत्महत्या केली. जोराचा आवाज झाल्यानं सुरक्षारक्षक इमारतीच्या परिसरात पोहोचला. त्यावेळी त्याला तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
फ्लॅट भाड्यानं घेतला, गर्लफ्रेंड्सना घेऊन गेले; लिपलॉक चॅलेंजनंतर घडलं असं काही...
धीना असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. धीना गेमिंगशी संबंधित यूट्यूब चॅनल चालवायचा. SELFLO असं या चॅनलचं नाव आहे. धीनानं आत्महत्या केली, त्यावेळी त्याचे आई-वडील झोपले होते. ते दोघेही नोकरी करतात. बुधवारी रात्री साडे आठ वाजता धीनाची आई कामावरून घरी आली. त्यावेळी धीना त्याच्या खोलीत झोपला होता, अशी माहिती सायबराबादचे पोलीस निरीक्षक एल. रवी कुमार यांनी दिली.
अरे कोण तू? ट्रेनिंगदरम्यान प्रेमविवाह; पोलीस दलात नोकरी लागताच पत्नी पतीला विसरली
धीना घरातच ऑनलाईन वर्गाला हजेरी लावायचा. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं त्याच्या आयुष्याबद्दल नमूद केलं आहे. त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. यूट्यूब चॅनलवर फारसे प्रेक्षक नाहीत आणि करिअरबद्दल मार्गदर्शनाचा अभाव यांचा उल्लेख धीनानं सुसाईड नोटमध्ये केला आहे. मी आयुष्यावर नाराज आहे. जीवनात काय करायचं त्याची मला कल्पना नाही. मला खूप एकटं वाटतंय, अशा शब्दांत धीनानं चिठ्ठीत म्हटलं आहे.

महत्वाचे लेख