अ‍ॅपशहर

मलाच लोकसभेत बोलू दिले जात नाही: मोदी

नोटाबंदीवर मी संसदेत बोललो तर भूकंप होईल असा इशारा देणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत.खोटारडेपणा अधिक काळ ठिकत नसल्याने ते पळ काढत आहेत असा हल्ला चढवितानाच मलाच लोकसभेत बोलू दिले जात नसल्याने मी जनसभेत बोलण्याचा निर्णय घेतला असल्याचा पलटवार मोदी यांनी विरोधकांवर केला.

Maharashtra Times 10 Dec 2016, 1:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i am not being allowed to speak in lok sabha pm modi
मलाच लोकसभेत बोलू दिले जात नाही: मोदी


नोटाबंदीवर मी संसदेत बोललो तर भूकंप होईल, असा इशारा देणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. नोटाबंदीवर त्यांचा असत्यपणा टिकत नसल्याने ते पळ काढत आहेत असा हल्ला चढवितानाच नोटाबंदीवर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. पण मलाच लोकसभेत बोलू दिले जात नसल्याने मी जनसभेत बोलण्याचा निर्णय घेतला असल्याचा पलटवार मोदी यांनी विरोधकांवर केला.

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना मोदी यांनी विरोधकांची पिसे काढली. पंतप्रधान संसदेत बोलायला तयार आहेत. हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. मी संसदेत बोलायला तयार आहे, हे त्यांनाही माहित आहे. मी जर बोललो तर त्यांचा असत्यपणा टीकणार नाही, हे जाणून असल्यानेच विरोधक मला संसदेत बोलू देत नाहीत, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढविला. आपल्या राष्ट्रपतींना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. संसदेचे कामकाज होत नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी विरोधकांच्या या वागण्यावर आक्षेप नोंदविल्यानंतरही विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. मतदान वाढविण्यासाठी आपण जसा प्रयत्न करतो, तसा प्रयत्न लोकांना बँकींग शिकविण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.

गोरगरीबांच्या हितासाठी आणि काळापैसा तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. देशातील गरीबातील गरीबांची ताकद वाढविण्याचे काम या नोटाबंदीतून करण्यात आले आहे. पुर्वी व्यापारी गरीबांना म्हणायचे, कच्चे बिल हवे की पक्के बिल?, घर खरेदी करतानाही चेक मागायचे आणि रोख रक्कम वेगळी घ्यायचे, असे करत करत या लोकांनी पैसा जमविला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली, असे सांगतानाच माझी लढाई दहशतवादाविरोधात आहे. सीमेपलिकडून चालणाऱ्या बनावट नोटांच्या काळ्याधंद्याविरोधात आहे. नक्षवादातून तरूण बाहेर पडत आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी रसद तोडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असेही मोदी म्हणाले.



सीसीटीव्ही कॅमेरे लावले
नोटाबंदीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा उल्लेख करुन मोदी म्हणाले, हा साधारण निर्णय नाही. हा अत्यंत अवघड निर्णय आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागणार असल्याचे आधीच सांगितले होते. पण ५० दिवसात परिस्थिती निवळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे सांगतानाच भ्रष्टाचार मुळापासून संपविण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. बँकेत काळा पैसा घेऊन येणारे तुरुंगात जात आहेत. मागच्या दरवाजाने काळा पैसा पांढरा करण्याचे अनेकांचे मनसूबे होते. पण सरकारने मागच्या दारातही कॅमेरे लावले आहेत. ८ नोव्हेंबर नंतर ज्यांनी कोणी पाप केले असेल ते वाचणार नाहीत. त्यांना शिक्षा मिळणारच असे मोदी यांनी ठणकावलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज