अ‍ॅपशहर

पर्रीकरांचे मन दिल्लीत रमेना...

चिमुकल्या गोव्यामध्ये राजकारण करताना, कमालीचे साधी राहणीमान आणि वेगळ्या कार्यपद्धतीची छाप पाडणारे मनोहर पर्रीकर दीड वर्षांनंतरही दिल्लीत रमलेच नाहीत. ‘संरक्षण मंत्रालयात काम करताना स्थिरावलो असलो, तरीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये अद्याप स्थिरावलो नाही,’ असे सांगून दिल्लीतील ‘बेरकी’ राजकारणापासून दूरच असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 9:38 am
नवी दिल्लीः चिमुकल्या गोव्यामध्ये राजकारण करताना, कमालीचे साधी राहणीमान आणि वेगळ्या कार्यपद्धतीची छाप पाडणारे मनोहर पर्रीकर दीड वर्षांनंतरही दिल्लीत रमलेच नाहीत. ‘संरक्षण मंत्रालयात काम करताना स्थिरावलो असलो, तरीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये अद्याप स्थिरावलो नाही,’ असे सांगून दिल्लीतील ‘बेरकी’ राजकारणापासून दूरच असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i can never be a delhi politician parrikar
पर्रीकरांचे मन दिल्लीत रमेना...


गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना, नोव्हेंबर २०१४मध्ये पर्रीकर यांची संरक्षणमंत्रिपदावर नियुक्ती झाली. केंद्रातील राजकारणामध्ये येण्यास पर्रीकर उत्सुक नसल्याची चर्चा सुरुवातीपासूनच रंगली होती. त्यातच, पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामध्ये पर्रीकर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येते. या काळामध्ये पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली असली, तरीही त्यांच्या गोव्यात परतण्याची चर्चा अधूनमधून रंगत असते. या पार्श्वभूमीवर, पर्रीकर यांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये ‘बाहेरचा’च असल्याचे म्हटले आहे, मात्र, गोव्यात परतणार असा त्याचा अर्थ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या कामाविषयी बोलताना पर्रीकर म्हणतात, ‘मी माझ्या खात्याच्या कामात आहे आणि त्यामध्ये रमलो आहे. या मंत्रालयाचे कामच गोपनीय पद्धतीने होत असते. हे कामच संपवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे दिल्लीतील समाजामध्ये मिसळण्याची फारशी संधी मिळत नाही. एखादे ५० वर्ष जुने झाड एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोवण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज